बंद

    पालक न्यायमूर्तींचे प्रोफाइल (परिचय)

    प्रकाशित तारीख: एफ जे, वाय
    RJM

    जन्मदिनांक : १५-०४-१९६८

    कालावधी : ०६-०६-२०२२ ते १४-०४-२०३०

    १५ एप्रिल १९६८ रोजी जन्म.

    अहमदनगर येथे शालेय शिक्षण पूर्ण केले. १९९१ मध्ये पुणे विद्यापीठातून एलएलबी (LLB) पदवी प्राप्त केली. १९९१ मध्ये वकील म्हणून नोंदणी केली आणि दिवाणी व फौजदारी अशा दोन्ही क्षेत्रांत वकिली केली. अहमदनगर येथील ‘न्यू लॉ कॉलेज’मध्ये अंशकालिक प्राध्यापक (Contributory Lecturer) म्हणून काम केले. तसेच, २००६ ते ३१ मे २००८ या काळात अहमदनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सरकारी वकील (Public Prosecutor) म्हणून काम केले. १५ जून २००८ रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून रुजू झाले. खेळांची विशेष आवड आहे.

    ६ जून २०२२ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली.